छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखरशिंगणापूर बद्दल वाचा थोडक्यात
शिखर शिंगणापूर मोठा महादेव महाराष्ट्र हा संतानी पराक्रमी पुरुषांनी आणि देवीदेवतांच्या वरदहस्तानी फुलवलेला संपन्न प्रदेश आहे. महाराष्ट्रातील असंख्य धार्मिक स्थळे खूप प्राचीन, स्वयंभू आणि जागृत इतिहास असूनही महाराष्ट्राच्या नकाशावर अनभिज्ञ आहेत. यातीलच एक धार्मिक ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूर इतिहास शिखर शिंगणापूर येथून दहा मिनिटांच्या अंतरावर गुप्तलिंग हे देवस्थान आहे. शिखर शिंगणापूरची कथा हि गुप्तलीगापासूनच सुरु होते. अख्यायिका अशी आहे कि गुप्तलीगावर श्री शंभू महादेव घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती माता भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटता क्षणी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वती मातेने श्री शंभू महादेवांची क्षमा मागितली. पार्वती मातेच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचे मिलन झाले. भगवान...
No comments: